sharad pawar gram samrudhi yojana राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय गोठ्यासाठी अनुदान मिळावे म्हणून शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय गोठा साठी अनुदान देण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःचे आधुनिक व पक्के गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तर चला जाणून घेऊया या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आणि पात्रता अटी शर्ती याचबरोबर अर्ज कसा करावा लागणार आहे याची संपूर्ण माहिती खाली पाहूया.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना : गाय गोठा अनुदान 2025
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 3 फेब्रुवारी 2021 रोजी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःचा एक पक्का गाय म्हैस पाळण्यासाठी गोठा बांधता यावा यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते आणि याच बरोबर जे कोणी शेळी पालन करत आहे कुक्कुटपालन करत आहे आणि पशुपालन करत आहे यांसाठी सुद्धा ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात पशुपालनासाठी जास्तीत जास्त चालना मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती.
आणि या योजनेबाबत पाहिलं तर या योजनेअंतर्गत जे कोणी पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा दिला जातो याचबरोबर ही योजना जे पशुपालक आहेत यांसाठी फायद्याची ठरते कारण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होऊन ते स्वतःचा पशुपालनाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करून एक शेतकऱ्यांना व्यवसाय उभा करता येतो याचबरोबर त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदतही होते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या गोठ्याचे सुरळीत नियोजन करून जे पशु आहेत यांचे आरोग्य सुद्धा चांगले ठेवायला मदत होते याचबरोबर या पशूंची निगा राखण्यासाठी आणि जो गोठा बांधण्यासाठी खर्च आहे हा खर्चाचे रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळते आणि याचबरोबर या अशा पशुपालनाच्या व्यवसायामुळे किंवा पशुपालन केल्यामुळे दुध उत्पादनात वाढ सुद्धा होते आणि यामुळे शेतकऱ्यांना व्यवसाय किंवा एक प्रकारची आर्थिक मदत होऊन शेतकऱ्यांच्या डोक्यावरील खर्चाचा बोजा कमी होतो.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेचे लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत तर तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायत मार्फत जे तुमचे तालुक्याचे ठिकाणी पंचायत समिती असते या पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा लागतो याचबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन जो जिल्हा पशुसंवर्धन विभाग असतो या विभागामार्फत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक उभा करण्याची जागा आहे त्या जागेचा मालकी हक्काची कागदपत्र आणि तुम्ही पशुपालन करत आहात याचा पुरावा सुद्धा तुम्हाला अर्ज सादर करताना द्यावा लागणार आहे.
योजनेअंतर्गत अनुदान किती दिले जाणार?
जर तुम्ही गाय गोठा साठी अर्ज केला आहे आणि तुमच्याकडे दोन ते सहा जनावरे आहेत तर या जनावरांच्या मर्यादेचा गोठा बांधण्यासाठी तुम्हाला 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते.
जर तुम्ही सहा ते बारा जनावरांचा गोठा बांधत असाल तर तुम्हाला या गोठ्यासाठी एक लाख 54 हजार 376 रुपये इतके अनुदान वितरित केले जाते.
आणि यापेक्षा सर्वात जास्त म्हणजेच तेरा पेक्षा अधिक जनावर जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 2 लाख 31 हजार 564 इतके अनुदान दिले जाते.
अर्ज करायचा असेल तर पात्रता काय आहे?
जो कोणी अर्ज करणार आहे तो शेतकरी असायला पाहिजे याचबरोबर हा पशु गोठा बांधण्यासाठी त्याची स्वतःची मालकीची जागा असणे आवश्यक आहे याचबरोबर जे पशु आहेत यांना पाळता येण्याचा अनुभव याचबरोबर पुरावा सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि याच बरोबर हा योजनेचा लाभ फक्त जे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत यांनाच या योजनेअंतर्गत दिला जातो.