namo shetkari yojana big update नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्र राज्य शासनाने जी पी एम किसान योजना आहे या पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासंबंधी योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसे जमा देखील करण्यात आलेले आहेत पण आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे तर चला संपूर्ण माहिती खाली पाहूया.
आपण आता यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत जो लाभ मिळत आहे या योजनेबरोबरच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत व्हावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नास थोडीशी वाढ म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केली होती आणि या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेसोबतच आतापर्यंत पाच हप्त्यांची रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेली आहे.
आता या योजनेमध्ये आपण पाहिलं तर जे पात्र शेतकरी आहेत या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये अनुदान खात्यात जमा केली जाते आणि पी एम किसान योजनेअंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये खात्यात जमा केले जातात म्हणजेच या दोन्ही योजनेचे मिळून तुमच्या खात्यामध्ये वर्षाला 12000 रुपयांना तुमच्या खात्यात जमा केली जाते परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आलेली आहे.
ती म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि आता यांच्या घोषणा नुसार नमो शेतकरी योजनेच्या जो चार माही दोन हजार रुपयांचा हप्ता आहे हा आता तीन हजार रुपये केला जाईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 15000 रुपये इतकी अनुदान खात्यात जमा केले जाऊ शकते.
नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा झाले?
आता आपण बघितले की मागील शुक्रवारी राज्य सरकारकडून जो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे हा जाहीर करण्यात आला आणि या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितले की 2023 24 पासून ही योजना राबवली जात आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ सुद्धा मिळत आहे आणि या योजनेअंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये वार्षिक अनुदान तीन हप्त्यांच्या स्वरूपात दिली जाते.
या योजनेअंतर्गत 2024 ऑक्टोबर पर्यंत जवळजवळ 92 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेअंतर्गत 9055 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेली आहे आता यामध्ये आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंतचा शेवटचा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला गेला होता.
शेतकऱ्यांच्या हप्त्यात वाढ केली जाईल का?
आता आपण यामध्ये पाहिलं तर जे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडवणीस यांनी काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी जी योजना आहे या योजनेअंतर्गत जो दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो हा आता तीन हजार रुपये केला जाईल अशी घोषणा केली होती आणि या कारणामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे की जे आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत.
यामध्ये हा निर्णय घेतला जाईल की नाही आणि शेतकऱ्यांना नमू शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला नऊ हजार रुपयांचा लाभ दिला जाईल की नाही असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे.