लाडक्या बहिणीचे 3000 रुपये एकत्र होणार खात्यात जमा आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

ladaki bahin yojana aaditi tatkare update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आता ज्या महिला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला पात्र आहेत या महिलांच्या खात्यात काही तासातच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र खात्यात जमा केले जाणार आहेत अशी घोषणा आदिती तटकरे यांनी केलेली आहे तर चला संपूर्ण माहिती पाहूया

आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याचे एकत्र तीन हजार रुपये लवकरच खात्यात जमा केले जाणार आहेत

 

हे पैसे 7 मार्चपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात वाटप केले जातील अशी माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स यावर पोस्ट करून माहिती दिलेली आहे

त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करून 7 मार्च 2025 पर्यंत ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यात सन्मान निधी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट म्हणून जमा केली जाईल अशी माहिती दिलेली आहे

राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महत्त्वाचा निर्णय घेऊन सात मार्च पर्यंत सर्व ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये हे जमा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याची घोषणा देखील आदित्य तटकरे यांनी केली होती आणि याची सुरुवात सुद्धा महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास झालेली आहे आज महिलांना खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील येण्यास सुरुवात झालेली आहे

राज्यांमधील किती महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये होणार जमा?

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय दिवसापूर्वी झालेल्या परभणीतील कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले होते की लाडक्या बहिणीच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही करण्यात आलेली आहे असे सांगितले होते

 

यामध्ये त्यांनी बोलताना सांगितलेली डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी 46 लाख महिला या पात्र होत्या आणि यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले गेले होते आणि त्यानंतर शासनाच्या नवीन निकषानुसार जानेवारी महिन्यात पाच लाख महिलांची संख्या कमी झाली होती आणि त्यानंतरही लाडक्या बहिणीच्या नवीन निकषानुसार अर्जांची पडताळणी सुरू झाली त्यानुसार नऊ लाख महिला पुन्हा कमी झाल्याची माहिती देण्यात आली होती

त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चा हप्ता ज्या महिलांना मिळणार आहे अशी संख्या ही कमी होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवीन नियमानुसार पात्रता

लाडक्या बहिणी योजनेसाठी महिला जर पात्र ठरवायचे असेल तर तिचे वय हे 21 वर्षे पूर्ण आणि 65 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे

महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे तरच लाभ मिळणार

लाभार्थी महिला चे आधार हे तिच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे

महिला जी लाभ घेत आहे त्या महिलाच्या कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न हे 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त नसायला पाहिजे

नवीन नियमानुसार राज्यातील कोणतीही महिला विवाहित किंवा विधवा याचबरोबर घटस्फोटीत किंवा निराधार महिला याचबरोबर कोणत्याही कुटुंबातील एकच अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते

Leave a Comment