पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा संधी या तारखेपासून अर्ज सुरू

pm kisan scheme online नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे आपल्याला तर माहीतच आहे पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांना एक मजबूत आणि मदतीचा हात म्हणून ही योजना ओळखली जाते आणि या योजनेअंतर्गत दर चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

याच योजनेअंतर्गत आता नवीन अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि जे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत या शेतकऱ्यांना आता नवीन अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याची मोठी संधी शासनाने दिली आहे.

आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात मात्र आपण पाहिलं तर बरेच सारे शेतकरी पात्र असून सुद्धा या योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा एक नवीन संधी देण्यात येत आहे त्या अंतर्गत नवीन अर्ज आता स्वीकारले जाणार आहेत तर चला संपूर्ण माहिती पाहूया.

पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा संधी

या योजनेअंतर्गत देशातील लाखो आणि करोडो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर बरेच सारे शेतकरी पात्र असून सुद्धा काही अनेक कारणामुळे या योजनेचा लाभ घेत नाहीत आणि या योजनेपासून वंचित आहेत परंतु आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

आणि ती म्हणजे आता शेतकऱ्यांना 15 एप्रिल 2025 पासून या योजनेसाठी नवीन नोंदणी करून या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता जर तुम्ही नवीन नोंदणी केली तर आणि या पुढील जो हप्ता मिळेल या हप्त्यासोबत तुम्हाला काही मागील हफ्त्यांचे देखील पैसे मिळण्याची शक्यता असणार आहे यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळाला आहे त्यामुळे जे पात्र शेतकरी आहेत यांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

या योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यायचा आहे?

आतापर्यंत जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करायचे आहे आणि त्यासाठी खालील अटी शर्ती तुमच्या पूर्ण असणे महत्त्वाचे आहे.

तुमच्याकडे किंवा तुमचे नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. याचबरोबर तुम्हाला तुमची एक केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची नोंदणी करा ही नोंदणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक असणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कशी करायची?

जर तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी तुमची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ही नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर(pmkisan.gov.in) जावे लागणार आहे.

त्यानंतर तिथे तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी असा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी आल्यानंतर तो टाकून संपूर्ण माहिती भरून अर्ज तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे अशाप्रकारे तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करू शकता.

शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी म्हणजे या योजनेअंतर्गत जर तुम्ही सध्याच नोंदणी करत असाल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र ठरत असाल तर जो येणारा हप्ता मिळणार आहे या हप्त्यासोबत तुम्हाला मागील काही हफ्त्यांचा सुद्धा लाभ मिळू शकतो यामुळे तुम्हाला एक आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकतो यामुळे जी शेतकरी पात्र आहेत यांनी लवकरात लवकर वेळ न घालता आपली नवीन नोंदणी करून घ्यावी.

Leave a Comment